
लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेच्या कोणत्या खात्यात येणार? आधारकार्ड नंबर टाकून चेक करा
Ladki Bahin Yojna: राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी योजनेसाठी (Ladki Bahin Yojna) राज्यभरातून अर्ज दाखल करण्यात आले असताना लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये येणार असल्याचे सांगण्यात आले. तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील महिला या योजनेचा लाभ घेत असाल तर हे पैसे नक्की कोणत्या खात्यात येणार हे तुम्हाला फक्त आधारकार्ड नं टाकून महाडिबीटीवर पाहता येणार आहे.
शासनाकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना थेट लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आलं आहेत. या योजनेचे पैसे थेट महिलेच्या बँक खात्यात जमा होणार असे सांगण्यात आले आहे. मात्र, हे पैसे नक्की कोणाच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. अनेक लाभार्थी महिलांना ही रक्कम कोणत्या खात्यात जमा होणार आहे. याविषयी संभ्रम आहे. तुमच्याकडे बँकखाते क्रमांक नसेल तर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड क्रमांकावरूनही ही रक्कम तपासता येणार आहे.
तुमचे पैसे आधारकार्डवरून येणार आहेत!
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे हे डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीच्या माध्यमातून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. म्हणजेच तुमचा आधार क्रमांक वापरून वापरून तुमच्या बँक खात्यावर ही रक्कम येणार आहे. यासाठी कोणतीही बँक डिटेल्स तपासले जाणार नाही. कारण डीबीटी प्रणालीअंतर्गत एकाचवेळी मोठ्या प्रमाणात खात्यात रक्कम पाठविण्यात येते. यासाठी तुमचे आधारकार्ड नक्की कोणत्या बँकेला लिंक केले आहे हे तुम्हाला तपासण्याची आवश्यकता आहे.
कोणत्या बँकेला आधारकार्ड जोडलंय तपासा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला अर्ज केलेल्या बऱ्याच जणांकडे एकाहून अनेक अकाऊंट असल्याने नक्की कोणत्या बँक खात्यात आपली रक्कम जमा होणार आहे याबाबत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतू डीबीटीमार्फत पैसे घेण्यासाठी तुम्हाला कोणत्यातरी एकाच बँक अकाऊंटला आधारकार्ड लिंक करता येते.
सर्वप्रथम येथे या संकेतस्थळावर जा.
https://myaadhaar.uidai.gov.in/
यात तुमचा १२ अंकी आधारकार्ड क्रमांक टाकून लॉगइन करा.
आधार क्रमांक टाकल्याने तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल. तो भरल्यानंतर त्यावर Bank Seeding Status असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा
यात तुमच्या आधारकार्डचे शेवटचे चार अंक दिसतील. आणि बँकेचे नाव दिसेल. आणि तुम्हाला तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे हे कळेल.
आधारकार्ड ज्या बँकेला लिंक आहे, त्याच खात्यावर लाभार्थी महिलेचे पैसे येणार आहेत.
3 Comments
Saguna padhrinath devkar · August 15, 2024 at 10:44 am
Tal. osmanabad Dis.ousmanabad. yedshi
राज्य सरकारने महिलांच्या अडचणी दूर केल्या; ‘लाडकी बहीण’ योजनेला मोठा फायदा - MH Sarkari Yojna · August 24, 2024 at 11:08 am
[…] मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यो… सगळीकडे चर्चा आहे. या योजनेसाठी आतापर्यंत साधारण दोन कोटींपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत. तर आतापर्यंत एक कोटीपेक्षा अधिक महिलांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात आली आहे. महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे 3000 रुपये देण्यात आले आहेत. दरम्यान, अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला असला तरीही काही महिलांना पैसे मिळालेले नाहीत. वेगवेगळ्या शुल्कांमुळे महिलांच्या बँक खात्यावर जमा झालेले पैसे संबंधित बँका कापून घेत आहेत. याच अडचणीची राज्य सरकारने दखल घेतली आहे. […]
“महत्वाकांक्षी ‘लाडकी बहिन योजना’: ऑगस्टमधील अर्जदार महिलांना मिळणार 4500 रुपये – महाराष्ट्र सरक · August 29, 2024 at 5:51 am
[…] […]