लेक लाडकी योजना: मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपयांची मदत

लेख लाडकी योजना 2024: महाराष्ट्र राज्यातील मुलींना जन्मापासून 18 वर्षांच्या वयापर्यंत एकूण 1 लाख 1 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेचा उद्देश मुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देणे आहे.
योजनेचे उद्दिष्ट
- मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे.
- शिक्षणाच्या क्षेत्रात मुलींना प्रोत्साहित करणे.
- मुलींच्या मृत्यू दरात घट करणे आणि बालविवाह रोखणे.
- कुपोषण कमी करणे.
- शाळाबाह्य मुलींचा प्रमाण 0 वर आणणे.
योजनेची पात्रता
- योजना पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांमध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 नंतर जन्माला आलेल्या एक किंवा दोन मुलींना लागू राहील.
- पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- जुळ्या अपत्यांच्या जन्मानंतर एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना लाभ मिळेल, परंतु कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अनिवार्य आहे.
- लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा लागतो आणि वार्षिक उत्पन्न 1 लाख पेक्षा कमी असावे.
योजनेचा लाभ
पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात लाभ घेणाऱ्याला खालीलप्रमाणे आर्थिक मदत मिळेल:
- मुलीच्या जन्मानंतर: 5,000 रुपये
- इयत्ता पहिलीत: 6,000 रुपये
- इयत्ता सहावी: 7,000 रुपये
- इयत्ता अकरावी: 8,000 रुपये
- 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर: 75,000 रुपये
एकूण रक्कम: 1,01,000 रुपये.
आवश्यक कागदपत्रे
- लाभार्थीचा जन्म प्रमाणपत्र.
- कुटुंब प्रमुखाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला.
- आधार कार्ड (लाभाच्या पहिल्या टप्प्यात शिथिल).
- पालकाचे आधार कार्ड.
- बँकेच्या पासबुकची छायांकित प्रत.
- रेशनकार्ड (पिवळे किंवा केशरी).
- मतदार ओळखपत्र.
- संबंधित शाळेचा प्रमाणपत्र (Bonafide).
- कुटुंब नियोजन प्रमाणपत्र.
- अंतिम लाभासाठी मुलीचा विवाह झालेला नसावा.
अर्ज प्रक्रिया
अर्ज कुठे करावा: अंगणवाडी सेविका
हे सर्व माहिती जाणून घेऊन, मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निर्णय घ्या.
0 Comments