लेक लाडकी योजना: मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपयांची मदत

लेख लाडकी योजना 2024: महाराष्ट्र राज्यातील मुलींना जन्मापासून 18 वर्षांच्या वयापर्यंत एकूण 1 लाख 1 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेचा उद्देश मुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देणे आहे.

योजनेचे उद्दिष्ट

  1. मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे.
  2. शिक्षणाच्या क्षेत्रात मुलींना प्रोत्साहित करणे.
  3. मुलींच्या मृत्यू दरात घट करणे आणि बालविवाह रोखणे.
  4. कुपोषण कमी करणे.
  5. शाळाबाह्य मुलींचा प्रमाण 0 वर आणणे.

योजनेची पात्रता

  • योजना पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांमध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 नंतर जन्माला आलेल्या एक किंवा दोन मुलींना लागू राहील.
  • पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • जुळ्या अपत्यांच्या जन्मानंतर एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना लाभ मिळेल, परंतु कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अनिवार्य आहे.
  • लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा लागतो आणि वार्षिक उत्पन्न 1 लाख पेक्षा कमी असावे.

योजनेचा लाभ

पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात लाभ घेणाऱ्याला खालीलप्रमाणे आर्थिक मदत मिळेल:

  • मुलीच्या जन्मानंतर: 5,000 रुपये
  • इयत्ता पहिलीत: 6,000 रुपये
  • इयत्ता सहावी: 7,000 रुपये
  • इयत्ता अकरावी: 8,000 रुपये
  • 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर: 75,000 रुपये

एकूण रक्कम: 1,01,000 रुपये.

आवश्यक कागदपत्रे

  1. लाभार्थीचा जन्म प्रमाणपत्र.
  2. कुटुंब प्रमुखाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला.
  3. आधार कार्ड (लाभाच्या पहिल्या टप्प्यात शिथिल).
  4. पालकाचे आधार कार्ड.
  5. बँकेच्या पासबुकची छायांकित प्रत.
  6. रेशनकार्ड (पिवळे किंवा केशरी).
  7. मतदार ओळखपत्र.
  8. संबंधित शाळेचा प्रमाणपत्र (Bonafide).
  9. कुटुंब नियोजन प्रमाणपत्र.
  10. अंतिम लाभासाठी मुलीचा विवाह झालेला नसावा.

अर्ज प्रक्रिया

लेक लाडकी योजनेच्या लाभार्थीची पात्रता अंगणवाडी सेविकांच्या देखरेखीखाली पडताळली जाईल. लाभार्थ्याने अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करावी आणि ते सक्षम अधिकाऱ्याकडे सादर करावे.

अर्ज कुठे करावा: अंगणवाडी सेविका


हे सर्व माहिती जाणून घेऊन, मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निर्णय घ्या.

लेकलाडकीयोजना #महाराष्ट्रसरकार #मुलींच्याशिक्षणासाठी


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now