शिंदे सरकारची मोठी घोषणा: 50 हजार नोकऱ्या उपलब्ध! अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे

नमस्कार मित्रांनो! शिंदे सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे – आता 50 हजार नोकऱ्यांची उपलब्धता आहे! जर तुम्हालाही नोकरीची गरज आहे तर तुम्ही लगेच अर्ज करू शकता. नवीन पदांमध्ये ‘योजनादूत’ या नावाने एक विशेष भूमिका तयार करण्यात आली आहे.
योजनादूत म्हणजे काय?
‘योजनादूत’ हा पद गावातील तरुणांसाठी असलेला एक महत्त्वपूर्ण संधी आहे. या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना सरकारकडून दरमहा 10,000 रुपये मानधन मिळेल. या नियुक्तीचा कालावधी 6 महिने असणार आहे, आणि पूर्ण झाल्यावर उमेदवारांना एक प्रमाणपत्रही दिले जाईल.
योजनादूतांची भूमिका:
योजनादूतांनी नागरिकांसाठी सुरू केलेल्या सरकारी योजनांची माहिती घरोघरी जाऊन देणे आवश्यक आहे. याशिवाय, गावातील लोकांना या योजनांचा लाभ कसा मिळवता येईल याबद्दल मार्गदर्शन करणे आणि माहिती पुरवणे हेही त्यांचे कर्तव्य आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- पदवी प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र

अर्ज कसा करावा?
अर्ज करण्यासाठी, https://mahayojanadoot.org/ या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करा. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 सप्टेंबर 2024 आहे.
तुमच्या नोकरीच्या संधीसाठी आजच अर्ज करा!
0 Comments